Sunday 10 November 2013

आला सण दिवाळीचा........................

आला सण दिवाळीचा, सजतील घरे रंगानी,
दाराभोवती पणत्या, रांगोळी
मुले फोड़तील फटाके,
आवाज होईल धडाम-धूम

काही लोक म्हणतात पूर्वी खुप स्वस्ताई होती. पण लोकां कड़े पैसे नव्हते. आता महागाई वाढली आणि पुन्हा एकदा पैसे कमी. आता जी लोक काम करतात त्या कामगारांना काहीच मीळत नाही शिवाय पगार. म्हणजे हेच म्हणावे लागेल की जे श्रीमंत त्या लोकाकडे दिवाळी करण्यास काहीच हरकत नाही आणि जे गरीब त्यांनी त्या आकाशात उड़नारया आतिशबाजी, लोकांचे भरजरी कपडे, दिवे पाहून समजायचे की मी सुद्धा दिवाळी करीत आहे. आणि त्यातच समाधान मानावे.

लहानपणाचे दिवस आठवतात. आमच्या शेजारच्या इमाकडे करंज्या बनविण्यास जात असे, जो रात्री सुरुवात केली तर सकाळीच पूर्ण बनवून होत असे. पण तो बनविण्यात काय आनंद होता. कंबर-पाठ एक होत असे. पण खरच दिवाळीचे फराळ बनविण्यास मजा येत असे. त्यानंतर आमच्या घरचे फराळ बनवत असे.

बाबा आमच्या भावंडासाठी फटाके फोंडण्यासाठी आणत असे. त्याचबरोबर नविन कपडे घेत असु. आई-बाबा स्वता साठी कपडे त्यांच्या साठी घेत नसत परंतु पोराची मौज पहिली पूर्ण करीत असे. आणि त्याबरोबर फराळ म्हणजे दिवाळी साजरी होत असे.

आता इतकी महागाई की वाडिलाना वाटत की काही फराळ, कपडे नको किती हे सगळ महाग?ह्या प्रश्नाने काहीच करावेसे वाटत नाही. साधे तेलाचे दिवे ही लावावेसे वाटत नाही. मन करत की बस बाहेरील सजलेल्या रोशनाई ला पाहत बसावे. अगदी फिरून याव, आपल्या परिजनाना भेटून हैप्पी दिवाळी बोलाव बस! म्हणजे झाली दिवाळी.

पूर्वी तर तीन-चार दिवसा अगोदर लहान मुले फटाके वाजवित असत, आणि आज दिवाळी चा सण असुनही कोणीही फटाके वाजवित नाही (तसे तर बरच म्हणे कारण प्रदुषण होणार नाही) परंतु त्यात ही आजची महागाई सुद्धा कमी नाही म्हणून बहुतेक फटाके दिसत नसावेत.

आजकाल कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळी बद्दल चे महत्त्व, नातीगोती जपण्यासाठी सणाचे महत्त्व दाखविले जात आहे, तसे तर उत्तमच आहे कारण आजकाल धावपळीच्या जगतात लोकांना कुठे वेळ की फराळ करावे, अभ्यंग स्नान करने (तेवढीच सुट्टी मिळते झोपण्यासाठी) परंतु छोट्याश्या कार्यक्रमाद्वारे सणाचे महत्त्व छान पटवून दिले आहे.


No comments:

Post a Comment