Tuesday 12 November 2013

शाळेतील २६ जानेवारी...............


आजचा शाळेतील प्रजासत्ताक दिवसामधे मुलानी वेगवेगळया प्रकारचे कार्यकृम दाखविले. ज्यात खुपच मजा आली. काही मुले खुपच लाजत होती तर काही बिनधास्तपणे करीत होती. एकिकडे गावातून आलेल्या प्रमुख पाहुन्यानी प्रत्येक कार्यक्रमाला खुश होऊन मुलांना पैसे देत होते.
दुसरीकडे गुरूजी सुचना देत होते की आता कोणता कार्यकृम होणार व कोणी किती बक्षिस बहाल केले. नाचन्याचा कार्यकृम मुलीच करीत होत्या व् इतर जसे गायनाचा, नाटकाचा प्रयोग मुले त्याबरोबर मुलीही करीत होत्या. एकूण १५ ते २० कार्यकृम करण्यातच आले होते.
त्यावेळेस  मुलानी एक नाटक बसविले ज्यात त्यांनी शाळेतील परिस्थिति दर्शविली. त्यात असे झाले की, नाटक झाल्यानंतर लोकानी समस्येचा मुद्दा उठविला. व् त्यावर पुढे काय करण्यात येइल त्यावर विचार करण्यात आला.
कार्यकृम झाल्यानंतर मुलाना शेंगदाने खाण्यास देण्यात आले व् मुले आपल्या घरी निघाली.

ह्या पूर्ण कार्यक्रमात मला आर्यनगर च्या शाळेतील दिवस आठवले. आह्मी सारी पोरे सकाळी लवकर उठत शाळेत जात असू. शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर मुलांचे भाषण होत असे, त्यानंतर आह्मा मुलाना पारले-जी बिस्किटाचा पुडा देत असे. व् आह्मी सगळे विद्यार्थी घरच्याला निघत असू. त्यानंतर रस्त्यात प्रायवेट शाळेतील मुलांचा कार्यकृम पाहत असू तसेच काही इमारती मधील सोसाटीमधे विशेष कार्यकृम होत असे ज्यात पूर्ण सोसाटीमधील पोर भाग घेत असे. तो कार्यकृम पाह्न्यास खुप मजा येत असे. मग दुपारपर्यंत कार्यकृम चालत असे जसा तो कार्यकृम संपला आह्मी सारी विद्यार्थी घरासाठी रवाना होत असू. अशारितीने २६ जानेवारी चा दिवस आह्मा पोरांचा पूर्ण होत असे.

No comments:

Post a Comment