Thursday, 3 April 2014

सुपारी v/s नाती


सुपारी चे नाव घेताच तीची टनक बाजू दिसून येते. तशीच नाती ही टनक असतात. कधी ती तुटली की जोडली जात नाही जर जोडली तर टूटने ही मुश्किल असतात. नात्यांचा गुंता सुटतात तसे सुटत नाही. तश्याच त्या सुपारीच्या कार्यक्रमाचा सोहळा होता.
सुपारीचा कार्यक्रम म्हणजे, मुली व मुला कड़ील पाहुणे मंडळी मुलीच्या घरी एकत्र येतात. तेथे मुला-मुलिकड़ील लोकांची ओळख करतात. एकमेकांची ओळख, लग्नाच्या, देण्या-घेण्याच्या गोष्टी जाहिर केल्या जातात. ते झाले की मुलाचा व मुलीचा मामा पाच सुपारी दगडाने किंवा वरवंटयाने फोडतात. मग मुलीला नारळ, तांदूळ, मुलाक़डची साडी देतात तसेच हळद-कुंकू लावतात. त्याचबरोबर मिठाईने एकमेकांचे गोड तोंड केले जाते. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. अश्यारितीने सुपारिचा कार्यकृम पार पाडला जातो.
कालच माझ्या मामाच्या मुलाचा सुपरिचा कार्यकृम होता तो सुद्धा मुलीच्या मंगळूर गावी. मग आह्मी पूर्ण सगळी माणस गावी गेलो. गावी पोहचल्या क्षणी आह्मला त्यांच्या घरातील लोकानी बसण्याची व्यवस्था केली. थोडयावेळाने एक वडिलधारक व्यक्ति आले, ते थोडावेळ बसल्यानंतर त्यांच्या घरातील लोकांना ओरडू लागले होते की आमच्या पाहुण्यासंगे बोलायला कोण ही नाही. त्यानंतर त्यांनी बाहेर सुपरिचा कार्यकृम करण्यास ठरविले. परंतु आमच्या पाहुण्यानी नकार दिला असे म्हणून की, “चवाठ्यावर का करायचे” तेथील मुलीची आई म्हणाली की, “नवीन घर केले आहे, त्याची पूजा झाल्याशिवाय कसे काय करता येईल कार्यकृम” आमच्या ही बायका म्हणाल्या, “हो बरोबर आहे”. परंतु त्याच घरात आह्मी दुपारचे जेवण केले, जेवल्यानंतर आमच्यातील दूसरी बाई म्हणाली की, हे काय सुपारिचा कार्यकृम नाही केला पण जेवण कसे काय केले?”
एकमेकांचे चुका काढने किती पटकन जमते माणसाला. आपण म्हणतो की कशाला चुका काढतो पण येतेच ते, कारण स्वताचे खरे करने हे प्रत्येकाला हवे असते.
नेमकी सुपारीची वेळ आली अन मुला-मुलीकड़ील मोठे व्यक्ती त्यांचे खाजगी गोष्टी लग्नकरण्याबाबत बोलत होते. पण दोघांमधे जेव्हा बाचाबाची सुरु झाली तेव्हा मुली-मुलाकडील पाहुणे मंडळी बोलू लागली. अन झाले असे की जो तो आपला मुद्दा अगदी ठणकावून सांगत होता की कसे लग्न झाले पाहिजे, कुठे झाले पाहिजे, खर्च-पाण्याचा प्रश्न इत्यादि गोष्टीवर अगदी जोरात चर्चा सुरु झाली, अन थोड्यावेळासाठी सगळे विसरून गेले होते की ज्या सोहळयासाठी आले आहेत तो पूर्ण करायचे परंतु म्हणतात की घरातील भांड्याला भांडे लागते. मग शेवटी दोन्ही परिवार एकच विचारविनिमय करून शेवटी सुपारी फुटली. म्हणूनच वाटते की नाती ही ह्या सुपारीसारखी कठिन तेवढीच भावनिक व जिव्हाळयाची असतात.
त्याच वेळेस तिथे एक आजोबा ही भेटले, वय त्यांचे एकशे सहा वर्षे. कोणाला तर माहीतही नसेल की त्यांचा जन्म कधी झाला असेल. त्यांचे बोलने अगदी स्पष्ट होते, त्यांना माहीत होते की काय चालु आहे, दूसरी अगदी वैशिष्टयाची बाब म्हणजे त्यांना नीट असे ऐकु येत होते आणि थोडेफार दिसत ही होते, इतके एक शतक जीवन जगणारे व्यक्ति खुपच कमी असतात. त्यांना पाहून जगायला काल एक अर्थ मिळत होता. खुप बारे वाटले, की इतके म्हातारे असूनही त्यांची ‍ ‌‌‍ज्ञानेद्रिये अगदी छान चालत होती, मग हे तरुणपण कितीतरी पटीने वेगाने चालले पाहिजे कारण त्यामधे कितीतरी गोष्टी आयुष्यात करण्यासारख्या आहेत. मग तर पुढे चालले पाहिजे बाकि सगळ्या गोष्टी मागे सोडून.

31st March 2014