Tuesday 12 November 2013

दिवस शाळेतील..........



आजची शाळेतील प्रार्थना सभा मैदानात करण्यात आली. त्यावेळेस काही मुले मजेने जे पाहिजे ते करीत होते, जसे खिशात हाथ घालने, पुढील मुलाच्या डोक्यात बघणे, आजू-बाजुला बघणे, आळस सोड़ने ते सुद्दा तोंडाद्वारे आ..आ.. करून. ही परिस्थिति पाहत असताना माझ्या ही शाळेतील तसेच शाळाह्या सिनेमातील प्राथना सभा आठवली. छोटया मुलांमाधे असे असते की ते एकमेकांशी बोलतात आणि मग त्याचवेळेस एक गुरूजी येतात व त्या मुलाच्या डोक्याला टपली मारून त्या मुलांस समोर पाहण्यास सांगतात. अशा प्रकारची प्राथना असते. काही प्राथना मुलाना बोलताच येत नाही तर ते तोंडातच बडबड करीत असतात.
काही मुली प्रार्थनेच्या वेळेस स्वतःचा वर्ग साफ़ करीत होत्या. त्यावेळेस लहानपनाचे दिवस आठवले, जेव्हा मी शाळेत होते त्यावेळस मी माझा पूर्ण वर्ग झाडून काढीत असे. वर्गात जास्त करून माती व चिन्चाच्या चिचुका असे. वर्गात झाड़ू मारित असताना खुप मजा येत असे.
प्रायवेट शाळेत शिपाई असताना तसल्या प्रकारचे काम मला करता येत नसत. आणि जर अश्या प्रकारचे काम केलेच तर ते वाईट मानले जाई. परन्तु जर मी शाळेत काम करीत असे तर असे वाटायचे की घरातच काम करीत आहे. तर ह्याही शाळेतील मुलाना पाहून असे वाईट वाटत नाही, कारण अश्या कामामुळे शाळेबद्द्लची आपुलकी वाढते व आजही ती कायम आहे.


No comments:

Post a Comment