Friday, 6 November 2015

बाळ आणि ते जोडप.....................


बाळ कोणाला असायला हवे की नव्हे अस समाज ठरवतो आणि काही स्वताच्या जीवनातील कल्पना मानव साकारीत असतो. म्हणून त्यानुसार एका बाळाचा जन्म होतो. लग्न झाल्यावर बऱ्याच स्त्रियांना वाटत की मूल असायला हव. आणि नाही झाले तर सुरु होतो अनेक डॉक्टरांच्या  फेऱ्या आणि इथेही नाही झाले तर आहे आपले दैवत ज्यांच्या कड़े गेल्यावर मनातील अनेक विचार-भावनांची इच्छापूर्ती होईल अशी आशा बाळगतात. कधीतरी चमत्कार होतो तर कधी दैवत बदलत असतात. 

जेव्हा मी childlessness ह्या पुस्त्केची प्रस्तावना वाचायला घेतली तिथे असा प्रश्न आला की महिला किंवा एकाध जोडप किंवा त्या परिवारातील लोक असे का नाही म्हणत की आह्माला बाळाला जन्म देण्याची काय गरज? अस कोणी स्वताला विचारित नाही का? एका बाजुला ती एक शारीरिक/मानसिक/सामाजिक गरज होऊन बसते तर दूसरीकड़े आपणच स्वताला प्रश्न विचारायला हवा वास्तविकतेला धरून की खरच बाळची गरज आहे का?  

अनेक वेळा महिलांच्या अनुभवातून ऐकले की, लग्न झाल्यानंतर महिलेला वाटत की आता बाळाची चाहुल लागायला हवी. ते कशापायी होते. तर त्याची अनेक कारण आहेत, एक तर स्वतापासून एक बाळ असयाला हवय ज्याला म्हणू शकतो की लैगिक/भावनिक गरज आहे. दूसरी कड़े समाजाने (संकुचित वुत्तीच्या लोकांनी) लग्न झाल्यावर वर्षभरात पाळणा हलायला हवाय असा स्वताच्या अपेक्षेचे दार त्या जोड़प्यास खुले करून देतात.

एक गोष्टींचा विचार करीत होते की, पुरुषांना असे कधी वाटते का त्यांना बाळ असायला हवे? ते कधी अस म्हणतात का आता लग्न झाले मला बाळ हवे. एक तर ऐकले होते की बाळ हवय पण तो सुद्धा मुलगा कारण आडनाव/बापाचा वारसा पुढे नेण्यासाठी बाळ(मुलगा) हवाय.


एकंदरीत वाटते की, ज्याचा त्याचा प्रश्न, त्यांच्या गरजेनुसार ठरवावा की, मूल हवे की नको. हव असेल तर त्याची पूर्वतैयारी करायला हवी. जेणेकरून त्या व्यक्तीची जडण-घड़ण योग्य रित्या करता येईल आणि त्याचबरोबर पोषणकर्त्याचाही विकास त्या बाळासंगे होईल.   

No comments:

Post a Comment