Monday, 2 November 2015

पहिले प्रेम हे तर पाहिले प्रेमच असते....................................


“पहिले प्रेम” वि. स. खांडेकरांची कांदबरी वाचल्यानंतर मनात कितीतरी गुद्गुद्ल्या होऊ लागल्या. असे वाटले की खरच पाहिले प्रेम कितीतरी आकर्षक वाटत. मलाही ते पाहिले प्रेम अगदी हवहवस वाटते. त्याच्यावीण्या जीवन अगदी नकोस वाटते. पाहिले प्रेम हे पाहिले प्रेमच असते. त्याची जागा कोणी दुसरे किंवा अनेक प्रेम घेऊ शकत नाही. पाहिले प्रेमाचे उदाहरण म्हणजे जसे स्त्री ला पहिल्या बाळची जी चाहुल लागते त्याप्रमाणे हे पाहिले प्रेम असत.

पाहिले प्रेम हेच शेवटचे प्रेम असे नशिबात खुपच कमी लोकांमधे होत असते. खुपदा पहिल्या प्रेमानंतर जेव्हा जीवनाची वास्तविकता समोर ठासते तेव्हा पहिल्याच प्रेमाची झीज दुसरे प्रेम पूर्ण करते. कारण ते कारावच लागत. आपल्या समाजात तितकीशी अशी पहिल्या प्रेमाची मान्यता अशी नाही. मोठ्या मानसांसाठी जी मुलगी आवडली त्याच-त्यांच्याच (मोठ्यांच्या) पहिल्या प्रेमासंगे लग्न करावे लागते. परंतु पहिल्या प्रेमाची झीज हे दुसरे प्रेम कधीच भरू शकणार नाहि.

समजा लग्नानंतर जर खुप वर्षानंतर जर पहिल्या प्रेमाला भेटलो तर जी गुदगुदी त्याच्यासंगे वाटत असे ती गुदगुदी तेव्हा हि तशीच जिवंत मनात असते. ती सर हे दुसरे प्रेम कसे बरे भागवू शकेन? जो विलक्षण आनंद पहिल्या प्रेमातच असतो.

पहिल्या प्रेमासाठी सर्वकाही सोडून द्याव अस वाटते. अगदी तेच आणि तेच आयुष्यभर रहावेसे वाटते. त्याच्या आवाज, स्पर्श नेहमी आपल्या भोवती अगदी फुलपाखराप्रमाणे रहावा असे वाटते.

तो माझ्याकडे असावा आणि कुठे त्याने जाऊ नये असे वाटते. त्याच्या हाताचा स्पर्श आजही कुठेतरी माझ्या शरीरावर फिरत रहावा आणि जरी कल्पना केलि ना तरीही त्या स्पर्शाची जाणीव जिवंत वाटते.
त्याला कळत कसे नाही की, इतक्या उत्कंठेने त्याची आठवण करते. तरी हि माझा आवाज त्याच्या पाशी जात नाही. आणि जरी गेला तरी तो मला पाहणार नाही इतकी तर खात्री मला पटली आहे. कारण जवळ येउन त्याने मला काहीही सांगितले नाही की मी त्याला पसंत करते किंवा मी त्याला पसंत करते. मी त्याला आवडते की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. त्याच्या जवळ जाऊन सांगावेसे वाटते, भरभरून बोलावस वाटते पण तो कुठे एकणार आहे. तो हेच म्हणणार मला, “इथे बघ अशी रडू नको, हे जग असेच आहे, ते आपल्याला वेगळ करणार त्यापेक्षा आपणच दोघे एकमेकांपासून वेगळ होऊन जाऊया”. असे शब्द त्याने उच्चारल्या नंतर मी तरी कुठे काय बोलणार. मि बस शांत पणे एकून त्याचे सगळ एकून घेणार.


आणि शेवटचे त्या पहिल्या प्रेमाला माझा अखेरचा सलाम असेल. पण पहिले प्रेम हे तर पाहिले प्रेमच असते. 

No comments:

Post a Comment