Saturday 10 January 2015

मनातले विचार................

(७ वीच्या वर्गात गेले असताना. त्यांच्यासंगे पहिल्यांदा लिहीण्याचा कार्यक्रम सुरु केला. त्यांना मी सांगितले की ह्यावेळेस जे मनात येते ते त्यांनी लिहून काढावे. त्या मधे असेही होऊ शकते की, जो विचार आता आला तो तुम्ही लिहून काढला पण त्याचबरोबर दुसर्या ही विचाराने उडी मारली तर ते लिहित जा. मग ते काहीही असो. यास मुक्त लेखन म्हणतात.
मग मुलांनी सुरुवात केली लिहायला. प्रत्येकाने आपापल्या गोष्टी लिहिल्या. त्यास शब्द दिले. पाहुया की त्यांनी काय लिहिले)

माझ्या मनात अस वाटल आहे की मला घरी जाऊन काम करून अभ्यास करायचा आहे आणि वही पूर्ण करायची आहे. व् पाठांतर करायचा आहे. कारण या वेळी आमच्या टीमला जास्त मार्क मिळणार अस वाटत. घरी गेल्यावर कोणता अभ्यास करायचा जो लवकर होईल.

मला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. घरी काम आहे आणि पाठांतर करायच आहे. ६:३० वाजता क्लासला जायचे आहे. आणि आता मला स्कॉलरशिप ची गणिते सोडवायची आहे आणि भविष्यात मला जागरूक महिला पुलिस कमिश्नर बनायचे आहे. आई, बाबा, माझ्या शिक्षिका यांचे नाव मोठे करायचे आहे. मला मम्मीचे स्वप्न साकार करायचे आहे.

मी कधी घरी जाउन भावाला घेणार? मी घरी जाउन खेळणार कधी? माझा अपूर्ण स्वाध्याय, अपूर्ण निबंध वहित पूर्ण करायचा आहे. माझ दप्तर तुटल आहे, माझी बहिन मला दप्तर देणार की नाही. 
  
मला आता डांस करायला जायच आहे. माझ्या आता मनात येते की, मी खेळायला जायचे आहे.

आज मला घरी जाऊन खुप अभ्यास करूशी वाटते आज मला खुप आनंद वाटला कारण आह्माला शिक्षकांनी आह्माला खुप चांगल शिकवल आहे. आज आमची प्रश्न उत्तरे पाठ घेतली. आमची कविता घेतली म्हणून आह्माला खुप आनंद वाटला.

अभ्यास चांगला करीन. रोज अभ्यास करीन. वाचन करीन. रोज शाळेत येणार. आणि नाही माहीत.

माझ्या मनात येतय की, मला क्लास चा खुप अभ्यास आहे. आणि माझ्या मामाची मुलगी येणार आहे. पण मला अस वाटत की, तीला कधी भेटते? मी कधी गेम खेळेल माझी मोठी आई तीची बहिण यांना दाखला पाहिजे आहे. तर आई बोलली अर्ज लिहून द्यायला. माझ्या बहिनीचा बर्थडे आहे तर काय तीला गिफ्ट देऊ?

माझ्या दोन बहिणी शिकल्या नाही. तर माझ्या आई-बाबांना वाटत की मी सुद्धा शिकणार नाही. पण मला वाटत की, मी पण वकील किंवा पोलिस होउन दाखविणार. आता मी आह्मी झोपडपट्टीत राहतो मग मी मोठ्या घरात राहणार.

मला विचार पडलाय की मला आता टीचरांनी प्रश्न दिलेली आहेत, ते सोडवायचे आहेत. ते झाल्यावरती मला डांस मधील स्पर्धेतील गान चुकल तर मला टीचर ओरडणार, ही मनातील भीती आहे. डांसमधे आमच्या वर्गाचा पहिला नंबर यावा ही इच्छा आहे.

मनात काहीही चालत नाही. घरी जायचय. रात्री खेळायला जायचय, अभ्यास करायचा, झोपयचय.

मला घरी जाऊन अभ्यास करायचा आहे. मला माझ्या रुपाली ताईला घ्यायला जायचे आहे. मला क्रिकेट खेळायचे  आहे. मला गाणे पाठ करायचे आहे. मी गावी केव्हा जाणार?

मी सुट्टी मधे गावी नक्की जाणार.

माझ्या शाळेत डांस होणार त्याच्यासाठी आह्मी गाण तयार केले आहे. त्याच्यासाठी डीजे मागवला आणि रंगीबेरंगी साडिया पहनने के लिए बोला है. तभी डांस टीचर का टेलीफोन बजा और टीचरने फोन के बाद डांस का लेक्चर दिया. और यह डांस पृथ्वी के शेतीवाडी उपर है.

शाळेमधे एक लेक्चर टीचर आल्या होत्या त्यांनी खुप छान समजावून सांगितली. शाळा सुटली एक साडी वाला साड्या घेउन विकत होता. त्यातली एक निळ्या कलरची साडी मला खुप आवडली. मी मम्मीला सांगायला फोन केला तेथे खुप मोटा आवाजाचा डीजे होता. म्हणून फोनवरुन काही एकु येत नव्हते. पृथीवरच्या आशिया खंडातील प्रसिद्ध शहरांची नावे मी वहीत उतरली. बाजुला एक स्टेज बांधला होता. अर्धी मुले गाणी गात होती, अर्धी मुले डांस करत होती. आमच्या घरी कही फंक्शन असले तर आह्मी डीजे लावतो आणि कधी आमच्या घरी हळद असली तर आह्मी डीजे लावतो आणि कधी बारसा, लग्न, साखरपुडा, असल तर आह्मी डीजे लावतो. माझ्या काकाच्या मुलाचा बर्थडे होता आणि तिकडे डीजे लावला होता आणि मी तिकडे नाचत होती.


आज मी घरी जाऊन मम्मीला सांगेल की मला झू मधे ने. तेथे जाऊन त्याच्या प्रजेची माहिती घेईन, झूमधे कामगार लोक प्राण्यांना कधी वागणुक देतात, झूचे लोग त्यांना खायला देतात की नाही.     

No comments:

Post a Comment