Friday, 6 November 2015

बाळ आणि ते जोडप.....................


बाळ कोणाला असायला हवे की नव्हे अस समाज ठरवतो आणि काही स्वताच्या जीवनातील कल्पना मानव साकारीत असतो. म्हणून त्यानुसार एका बाळाचा जन्म होतो. लग्न झाल्यावर बऱ्याच स्त्रियांना वाटत की मूल असायला हव. आणि नाही झाले तर सुरु होतो अनेक डॉक्टरांच्या  फेऱ्या आणि इथेही नाही झाले तर आहे आपले दैवत ज्यांच्या कड़े गेल्यावर मनातील अनेक विचार-भावनांची इच्छापूर्ती होईल अशी आशा बाळगतात. कधीतरी चमत्कार होतो तर कधी दैवत बदलत असतात. 

जेव्हा मी childlessness ह्या पुस्त्केची प्रस्तावना वाचायला घेतली तिथे असा प्रश्न आला की महिला किंवा एकाध जोडप किंवा त्या परिवारातील लोक असे का नाही म्हणत की आह्माला बाळाला जन्म देण्याची काय गरज? अस कोणी स्वताला विचारित नाही का? एका बाजुला ती एक शारीरिक/मानसिक/सामाजिक गरज होऊन बसते तर दूसरीकड़े आपणच स्वताला प्रश्न विचारायला हवा वास्तविकतेला धरून की खरच बाळची गरज आहे का?  

अनेक वेळा महिलांच्या अनुभवातून ऐकले की, लग्न झाल्यानंतर महिलेला वाटत की आता बाळाची चाहुल लागायला हवी. ते कशापायी होते. तर त्याची अनेक कारण आहेत, एक तर स्वतापासून एक बाळ असयाला हवय ज्याला म्हणू शकतो की लैगिक/भावनिक गरज आहे. दूसरी कड़े समाजाने (संकुचित वुत्तीच्या लोकांनी) लग्न झाल्यावर वर्षभरात पाळणा हलायला हवाय असा स्वताच्या अपेक्षेचे दार त्या जोड़प्यास खुले करून देतात.

एक गोष्टींचा विचार करीत होते की, पुरुषांना असे कधी वाटते का त्यांना बाळ असायला हवे? ते कधी अस म्हणतात का आता लग्न झाले मला बाळ हवे. एक तर ऐकले होते की बाळ हवय पण तो सुद्धा मुलगा कारण आडनाव/बापाचा वारसा पुढे नेण्यासाठी बाळ(मुलगा) हवाय.


एकंदरीत वाटते की, ज्याचा त्याचा प्रश्न, त्यांच्या गरजेनुसार ठरवावा की, मूल हवे की नको. हव असेल तर त्याची पूर्वतैयारी करायला हवी. जेणेकरून त्या व्यक्तीची जडण-घड़ण योग्य रित्या करता येईल आणि त्याचबरोबर पोषणकर्त्याचाही विकास त्या बाळासंगे होईल.   

Tuesday, 3 November 2015

संशयी वृत्ती त्यांच्या दोघामधे.......................


पती-पत्नी मधील संशय पाहून असे वाटते की, ते फक्त घाबरलेले आहे एकमेकांपासून जर दूर झालो तर. किंवा ते असे मानून असतात की, जर माझा नवरा/बायको दूसरी कड़े गेला तर, माझे काय होइल. ह्या विचारांनी त्याना ग्रासून ठेवलेले असते. अशा वेळेस ना ते स्वता जगतात की आपल्या पाटर्नर ला जगुन देत असतात. सतत भयाच सावट त्यांच्या आयुष्यात वेगवेळया संशयाने येरझारा घालित असतात.
ज्या नात्यात प्रेम, काळजी फुलायला हवी तेथे फक्त नी फक्त भितिपोती राग, द्वेष निर्माण झालेला असतो. तेथे ते कधीही खुश राहू शकत नाही. तेथे भावनिक रित्या ते जोड़प अगदी पिळन गेलेले असते. स्त्री/पुरुषांच्या प्रत्येक शब्द, वेशभूषा, नाती-गोती ह्या प्रत्येक गोष्टीत संशयाचा कल्लोळ मांडलेला असतो.

पीड़ित व्यक्ती आपल्या आवडी-निवडी कुठेही दर्शावु शकत नही. स्वताचा स्वतंत्र ते हिरावून बसलेले असतात. असे वाटते की जर संशियित व्यक्तीला कळले तर काय अवस्था होईल. वाचा तर अगदी त्यांची तर अगदी बंदच झालेली असते.

एकदा ट्रेन मधे बसले असताना, समोरून एका मुलीला फोन येत असतो. त्यावेळस फोन येतो तिच्या प्रियकराचा फोन उचलते अन त्याला बोलायला सुरुवात करते की, “तुला माझा पासवर्ड कशाला हवाय. ते घेउन तो काय करशील, मी तुला नाही देणार. पर्सनल गोष्टी पर्सनलच ठेवाव्या” पती म्हणतो की, “पती-पत्नी मधे पर्सनल असे काहीही नसते, त्यांच्या मधे सगळया गोष्टी उघड असतात. त्यात मेल मधे लपवीण्यासारखे काय आहे?” ह्या संभाषनातुन एकच वाटले की, मुलीने तर कधीच आपल्या पतीकडून कोणत्याही गोष्टीचा पासवर्ड नाही मागितला. दूसरी गोष्ट की, सगळया गोष्टीची माहिती त्या पतीला माहीत असायला हवी अशी सक्ती पती पत्नीला करतो. तीसरी गोष्ट अशी वाटली की, स्वताचे व्यक्तिमत्त्व नसलेल्या पती, आणि पत्नीचे हि व्यक्तिमत्त्व नाहीसे करायला निघालेला तो पती होता. तो फक्त आपल्याच जाळयात अडकवू पाहत होता तिच्या पत्नीला. तिचा रोज कोणाशी सवांद होतो, काय होतो, कसा होता ह्या सगळ्या गोष्टीचे रिपोर्टिंग त्याला हवे असते.

एकदा तर एका मुलीने तिचे अनुभव असे सांगितले की, तीला तिच्या एडमिन डिपार्टमेंट मधून एक फॉर्मल मेल आला, त्या मेल ची सुरुवात “डिअर” अशी होती त्यामुले तिच्या बॉयफ्रेंड ने तिचे अकाउंट उघडून, असे मेल केले की, “please use Mrs Sumita rather than Dear Sumita”.  असा रिप्लाई पाहून त्या मूलिस धक्काच बसला. तसेच तिच्या साठी हि गोष्ट पण शरमेची होती की तिचे एडमिन डिपार्टमेंट काय विचार करत असतील.


तर अशा प्रकारच्या घटना ह्या संशयीवृत्ती मुले दोन प्रेमाच्या जीवनाचे नाते संपुष्टात येण्या सारखेच असते.

Monday, 2 November 2015

पहिले प्रेम हे तर पाहिले प्रेमच असते....................................


“पहिले प्रेम” वि. स. खांडेकरांची कांदबरी वाचल्यानंतर मनात कितीतरी गुद्गुद्ल्या होऊ लागल्या. असे वाटले की खरच पाहिले प्रेम कितीतरी आकर्षक वाटत. मलाही ते पाहिले प्रेम अगदी हवहवस वाटते. त्याच्यावीण्या जीवन अगदी नकोस वाटते. पाहिले प्रेम हे पाहिले प्रेमच असते. त्याची जागा कोणी दुसरे किंवा अनेक प्रेम घेऊ शकत नाही. पाहिले प्रेमाचे उदाहरण म्हणजे जसे स्त्री ला पहिल्या बाळची जी चाहुल लागते त्याप्रमाणे हे पाहिले प्रेम असत.

पाहिले प्रेम हेच शेवटचे प्रेम असे नशिबात खुपच कमी लोकांमधे होत असते. खुपदा पहिल्या प्रेमानंतर जेव्हा जीवनाची वास्तविकता समोर ठासते तेव्हा पहिल्याच प्रेमाची झीज दुसरे प्रेम पूर्ण करते. कारण ते कारावच लागत. आपल्या समाजात तितकीशी अशी पहिल्या प्रेमाची मान्यता अशी नाही. मोठ्या मानसांसाठी जी मुलगी आवडली त्याच-त्यांच्याच (मोठ्यांच्या) पहिल्या प्रेमासंगे लग्न करावे लागते. परंतु पहिल्या प्रेमाची झीज हे दुसरे प्रेम कधीच भरू शकणार नाहि.

समजा लग्नानंतर जर खुप वर्षानंतर जर पहिल्या प्रेमाला भेटलो तर जी गुदगुदी त्याच्यासंगे वाटत असे ती गुदगुदी तेव्हा हि तशीच जिवंत मनात असते. ती सर हे दुसरे प्रेम कसे बरे भागवू शकेन? जो विलक्षण आनंद पहिल्या प्रेमातच असतो.

पहिल्या प्रेमासाठी सर्वकाही सोडून द्याव अस वाटते. अगदी तेच आणि तेच आयुष्यभर रहावेसे वाटते. त्याच्या आवाज, स्पर्श नेहमी आपल्या भोवती अगदी फुलपाखराप्रमाणे रहावा असे वाटते.

तो माझ्याकडे असावा आणि कुठे त्याने जाऊ नये असे वाटते. त्याच्या हाताचा स्पर्श आजही कुठेतरी माझ्या शरीरावर फिरत रहावा आणि जरी कल्पना केलि ना तरीही त्या स्पर्शाची जाणीव जिवंत वाटते.
त्याला कळत कसे नाही की, इतक्या उत्कंठेने त्याची आठवण करते. तरी हि माझा आवाज त्याच्या पाशी जात नाही. आणि जरी गेला तरी तो मला पाहणार नाही इतकी तर खात्री मला पटली आहे. कारण जवळ येउन त्याने मला काहीही सांगितले नाही की मी त्याला पसंत करते किंवा मी त्याला पसंत करते. मी त्याला आवडते की नाही हे सुद्धा मला माहीत नाही. त्याच्या जवळ जाऊन सांगावेसे वाटते, भरभरून बोलावस वाटते पण तो कुठे एकणार आहे. तो हेच म्हणणार मला, “इथे बघ अशी रडू नको, हे जग असेच आहे, ते आपल्याला वेगळ करणार त्यापेक्षा आपणच दोघे एकमेकांपासून वेगळ होऊन जाऊया”. असे शब्द त्याने उच्चारल्या नंतर मी तरी कुठे काय बोलणार. मि बस शांत पणे एकून त्याचे सगळ एकून घेणार.


आणि शेवटचे त्या पहिल्या प्रेमाला माझा अखेरचा सलाम असेल. पण पहिले प्रेम हे तर पाहिले प्रेमच असते.